मुंबई : जसप्रीत बुमराहच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं. यासह मुंबईने लखनौचा वानखेडेच्या मैदानावर ५४ धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी २१६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचा संघ २० षटकांत फक्त १६१ धावा करत क्लीन बोल्ड झाला.
संपूर्ण संघ तुफान फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या मोठ्या विजयासह मुंबईचा नेट रन रेट वाढला असून चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ १२ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांनी फटकेबाजी केली खरी, पण तिसऱ्या षटकात बुमराहने संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. एडन मारक्रम ९ धावा करत बाद झाला. तर मिचेल मार्श ३४ धावा करत बाद झाला. निकोलस पुरन आणि मार्शने पॉवरप्लेमध्ये संघाला ६० धावांचा टप्पा गाठून दिला. पण विल जॅक्सने पुरन आणि पंतला एका षटकात बाद करत सामना मुंबईच्या बाजूने फिरवला.
जसप्रीत बुमराहच्या ४ विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं. यासह मुंबईने लखनौचा वानखेडेच्या मैदानावर ५४ धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील सलग पाचवा विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी २१६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचा संघ २० षटकांत फक्त १६१ धावा करत क्लीन बोल्ड झाला.
संपूर्ण संघ तुफान फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या मोठ्या विजयासह मुंबईचा नेट रन रेट वाढला असून चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ १२ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.