२ जुलैला एमडीसी चषक शालेय बुध्दिबळ स्पर्धा

Santosh Sakpal 20, 6-22 11:46 PM

mumbai : आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २ जुलै रोजी क्रीडाप्रेमी मंगेश दिनकर चिंदरकर-एमडीसी चषक  १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परेल येथील आरएमएमएस सभागृहात ही स्पर्धा ७/८/१०/११/१३/१४ वर्षाखालील ६ वयोगटात रंगणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांसाठी एकूण ९० पुरस्कार असून प्रत्येक वयोगटात १० मुलांसाठी व ५ मुलींसाठी गुणानुक्रमे पुरस्कार व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.     

    मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने क्रीडाप्रेमी मंगेश चिंदरकर यांच्या एकसष्ठीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेतील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे वेळेच्या मर्यादेत होईल. किमान चार साखळी सामने खेळविण्यात येतील. घड्याळ, पट आदी बुध्दिबळ साहित्यांची व्यवस्था संयोजकांमार्फत होईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी स्पर्धा समितीचे सहसचिव ओमकार चव्हाण किंवा मुंबई बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे २५ जूनपर्यंत संपर्क साधावा