एमडीसी बुध्दिबळ: त्वेषा, आहन, हिरणमयी, आराध्य, श्रिया, नेहान प्रथम

Santosh Sakpal July 07, 2023 05:26 PM

mumbai : आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रीडाप्रेमी मंगेश दिनकर चिंदरकर-एमडीसी चषक शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील ८ वर्षाखालील मुली गटात राज्य विजेती त्वेशा जैनने अपराजित राहून साखळी ५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. अन्य वयोगटात आहन कटरुका, हिरणमयी कुळकर्णी, आराध्य पार्टे, श्रिया जोशी, नेहान मेहता यांनी प्रथम स्थानावर झेप घेतली. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह मुंबई, ठाणे पालघर, रायगड जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगली. स्पर्धेप्रसंगी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्यकारी सदस्य व क्रीडा कार्यकर्ते मंगेश चिंदरकर यांचा एकसष्ठीनिमित्त शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सुवर्णमुद्रा देऊन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरव केला.

क्रीडाप्रेमी मंगेश चिंदरकर यांच्या एकसष्ठीनिमित्तच्या शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील ८ वर्षाखालील गटात मुलांमध्ये आहन कटरुकाने (५ गुण) प्रथम, वेदांत श्रीवास्तवने (५ गुण) द्वितीय, हितांश गोहिलने (५ गुण) तृतीय व मुलींमध्ये त्वेशा जैनने (५ गुण) प्रथम, आश्वी अगरवालने (४ गुण) द्वितीय, सर्वा परेलकरने (४ गुण) तृतीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये आराध्य पार्टेने (४ गुण) प्रथम, हितांश कोठारीने (३.५ गुण) द्वितीय, अमोघ आंब्रेने (३ गुण) तृतीय व मुलींमध्ये हिरणमयी कुळकर्णीने (५ गुण) प्रथम, देविका पिंगेने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (३ गुण) तृतीय तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये नेहान मेहताने (४.५ गुण) प्रथम, अंशुमन समळने (३.५ गुण) द्वितीय, मनन शाहने (३ गुण) तृतीय व मुलींमध्ये श्रिया जोशीने (४ गुण) प्रथम, मयंका राणाने (३ गुण) द्वितीय, सोनाक्षी महाजनने (२ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे स्पर्धेला सहकार्य लाभले होते.