सरकारला आरक्षण द्यायचं कि राजकारण करायचं ? अंबादास दानवे

Santosh Gaikwad September 11, 2023 04:09 PM


मुंबई  : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्रयांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे या बैठकीसाठी अनेक छोटया मोठया पक्षांना निमंत्रण देण्यात आली मात्र शिवसेना पक्षाला अधिकृत बोलावलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला बोलावण्यात आहे आहे असा आरोप विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला आहे. याबाबत विभागाच्या सचिवांकडे आक्षेप नोंदविण्यात आला आहे, यातून सरकार काय साधू इच्छिते ? सरकारला आरक्षण द्यायचं आहे, कि राजकारण करायचं आहे ? असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.  


 मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्रयांनी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या बैठकीच्या अगोरदर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी पत्रकार  परिषद घेत सरकारवर टीका केली.  मराठा आरक्षणासाठी समिती नेमण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील हे त्या समिती अध्यक्ष आहेत. मात्र आजच्या बैठकीत त्यांच नाव कुठेच नाही.  त्यांना मंत्री म्हणून कि समितीचा अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आले असा सवालही दानवे  यांनी याप्रसंगी उपस्थित केला. मराठा समाजासोबतच ओबीसी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिकाही दानवे यांनी व्यक्त केली.  


एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात, दुसरीकडे एक उपमुख्यमंत्री कोल्हापूर तर एक दहीहंडी फोडतात. मात्र उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. 

अनेक गावांत तरुण उपोषणाला बसले आहेत. ३००  लोक जखमी झालेत त्यांच्याकडेही सरकारला ढुंकूनही पाहायला वेळ नाही. उपोषणकत्यांना भेटण्यासाठी सरकारमधील मंत्रयांना वेळ नाही. कोणाच्यातरी हातून पाकिट पाठवली जातात. सरकारला आंदोलनाची जाणीव नाही अशी टीका दानवे यांनी केली.  

सरकार मराठाला आरक्षण देणार असेल तर शुभेच्छा  आहे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही शिवसेनेची भूमिका आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे.  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ५० टक्के आरक्षण वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही दानवे म्हणाले. 


मराठवाडयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठवाडयात येत आहे त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम 75 वर्षे झाले म्हणून येत आहे. पण भाजपने मराठा विकास या भूमिकेकडे दुर्लक्ष केले. स्वतःच मार्केटिंग, शो बाजी करण्यासाठी अमित शहा  येत आहेत त्यासाठी कोट्यवधी रुपये मंडपासाठी खर्चकेला जात आहे. हाच पैसा विकासासाठी  आणि हितासाठी नाही. उधळपट्टी सुरू असून याचा निषेध निषेध करीत असल्याचे दानवे म्हणाले. 


कृषी धोरण सपशेल चुकलेल आहे. दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. बीड जिल्हा हा भारतातील सर्वांत जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. मुंबईतील स्टॉक एक्सचेंज गुजरातकडे हलविण्याचा डाव सुरू आहे. मात्र मुंबईकर कदापि होऊ देणार नाही असेही दानवे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पळपुटे असल्याची टीकाही दानवे यांनी केली.  सतेची हाव, एमसी बँकेचा घोटाळा आणि ईडीपासून वाचण्यासाठी ते सत्तेत सहभागी झाल्याचे दानवे म्हणाले.