महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम, भाजपचे दिल्लीत, मुंबईत जोर बैठका सुरू : आज शिक्कमोर्तब होण्याची शक्यता!

Santosh Gaikwad March 06, 2024 09:34 AM



मुंबई : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र पहिल्या यादीत भाजपने महाराष्टातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेले नाही. महाराष्ट्रात भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती आहे. फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याने  जागा वाटप रखडलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौ-यावर असून मुंबईत बैठका सुरू आहेत. तर आज दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे आज जागा वाटपाचा तिढा सुटून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

  महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. ०१९ च्या निवडणुकीत या  मतदारसंघांपैकी  जागांवर भाजप,  जागांवर शिवसेना आणि ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. उर्वरित तीनपैकी एका जागेवर काँग्रेसचा, एका जागेवर एआयएमआयएमचा आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही पक्षांचे दोन-दोन गट पडले. मूळ शिवसेनेच्या निवडून आलेल्या ८ खासदारांपैकी  खासदार एकनाथ शिंदेंच्या बाजूनं गेले. तर मूळ राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या ५ खासदारांपैकी १ खासदार अजित पवारांच्या बाजूनं गेले.  शिंदेंची शिवसेना  जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडूनही काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा  सांगितला जात आहे. 
  
महाराष्ट्रात सध्यस्थितीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे गट आणि पवार गटाकडून  जागांची मागणी केली जात आहे.  जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रात्रीपासून मुंबईतील सहृयाद्री अतिथीगृहात तासभर खलबंत झाली होती.  मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. 

अमित शाहंबरोबर आजही बैठक 

आजही अमित शहांची बैठक होणार आहे. अमित शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समजते. अजित पवार गटाकडे सध्या एक खासदार आहे. या गटाने लोकसभेसाठी १२ जागांची मागणी केली असली तरी सुध्दा त्यांना दोन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाला बारामती आणि मावळची जागा सुटण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपात भाजपचं पारंड जड राहणार असून ३५ पेक्षा अधिक जागा लढविणार असल्याचे बोलले जाते. 
-------------