महाविकास आघाडीची २ ऑगस्टला बैठक

Santosh Gaikwad August 01, 2023 11:52 PM


मुंबई : महाविकास आघाडीने आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यासही सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदाराची बुधवार २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजता संयुक्त बैठक चर्चगेट येथील एमसीए लॉंग येथे पार पडणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.  


या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.