महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालय आणि विधानभवनाच्या इमारतीवर करण्यात आलेली रोषणाई

Santosh Gaikwad 20, 4-30 11:20 PM


महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम


  मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र  राज्याच्या   65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बुधवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालय आणि विधानभवनाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे. 


     मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 8 वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी 9 वाजता प्रसारित केल्या जाणार आहे.