मुंबई : महाराष्ट्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९२६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.१२ टक्के झाले आहे. दरम्यान गुरुवारी राज्यात ८०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती आणि तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गेल्या २४ तासांत २७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महापालिकेकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ९८.२ टक्के असून दिवसभरात १०४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ३७६ आहे. गुरुवारी मुंबईत २१६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
५ एप्रिल – २२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
४ एप्रिल – २२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
३ एप्रिल – १७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
२ एप्रिल – १७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
१ एप्रिल – १८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
३१ मार्च – १७७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
३० मार्च – १९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
२९ मार्च – १३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
२८ मार्च – १३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद