अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ! !

Santosh Gaikwad January 30, 2024 11:10 PM


मुंबई : रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही घोषणा केली आहे. 


अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.


अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.


रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता :  मुख्यमंत्री 


 अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. हम पांच या मालिकेतला त्यांचा अभिनय केला आहे. निवेदिता जोशी या त्यांच्या पत्नी आहेत.


काय म्हणाले अशोक सराफ 


अशोक सराफ प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला काही वेळापुर्वी मला याची माहिती मिळाली.  'मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. माझी धडपड कुठेतरी सार्थकी लागली असं मला वाटतं आहे. माझं काम सर्वांना आवडतं आहे याचा मला फार आंनद वाटतो आहे. मी जे करतोय ते मला आवडेल की नाही यापेक्षा प्रेक्षकांना ते आवडतं की नाही याची काळजी मी नेहमीच घेतली. आत्तापर्यंत ज्या-ज्या माणसाने मला साथ दिली त्या सर्वांचं हे श्रेय आहे, माझी पत्नी निवेदिता ती खंबीरपणे माझ्यासोबत राहिली, सर्वांनी माझ्या कामात मला साथ दिली त्या सर्वांचं हे श्रेय आहे, असंही पुढे अशोक सराफ म्हणालेत.