PM मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर : शरद पवार उपस्थित राहणार का ?

Santosh Gaikwad July 10, 2023 09:28 PM


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना १ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे. मोदींना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार उपस्थितीत राहणार आहेत. याच कार्यक्रमचं आमंत्रण शरद पवार यांनाही देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहेत. 

 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचा ७० हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पाडत अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावरूनच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी या नेत्यांची पूर्ण ताकदीने चौकशी करावी. आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ. अशातच आता मोदी आणि पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार का ? हे पाहावं लागणार आहे.

तसेच राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत मंचावर दिसू शकतात. असं असलं तरी शरद पवार यांनी अद्याप या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.