आज लोकसभेचे बिगुल वाजणार, आचासंहिता जाहीर होणार : राज्य मंत्रिमंडळाची बैठक !

Santosh Gaikwad March 16, 2024 10:56 AM



मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. दरम्यान आजपासूनच आचारसंहिता लागू होणार असल्याने राज्य मंत्रिमंडळाची बैठक तातडीने बोलविण्यात आली आहे. 

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. सर्वच पक्षांमधील जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत देशातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशभरातील लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात हेाईल, कोणत्या राज्यात कुठल्या दिवशी  मतदान आणि निकाल  होणार हे स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान संध्याकाळपासून आचारसंहिता लागू होणार असल्याने राज्य मंत्रिमंडळाची सहृयाद्री अतिथीगृहात तातडीने बैठक होणार आहे. आठवडाभरातील हि तिसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.