*महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान व परिसंवाद*

Santosh Gaikwad November 27, 2023 05:56 PM


मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले, यशवंतराव चव्हाण आणि शिवनेरकार वाबळे यांच्या संयुक्त पुण्यतिथीचा कार्यक्रम दै. शिवनेर व श्री सावतामाळी भुवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई ४००००१ येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रारंभी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचा विषय आहे ‘महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील नररत्न’.

सायंकाळी ६.०० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून अध्य्क्षस्थान सुप्रसिद्ध गजलकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य श्री. दिलीप पांढरपट्टे भुषविणार आहेत. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आणि पुरोगामी विचारवंत दत्ता बाळसराफ सहभागी होणार आहेत. परिसंवादाचा विषय आहे ‘पुरोगामी महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे योगदान’.


   या कार्यक्रमास लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवनेरचे संपादक श्री. नरेंद्र वि. वाबळे व श्री सावतामाळी भुवन ट्रस्टचे अध्यक्ष शरद अभंग आणि सेक्रेटरी हेमंत मंडलीक यांनी केले आहे.