तीन बळी घेणार्‍या केरळा ट्रेन अग्नीतील संशयीतास रत्नागिरीत अटक

Santosh sakpal April 05, 2023 01:54 PM

मुंबईः केरळात रविवारी रात्री ट्रेनला लागलेल्या आगीत तीस जणांचा बळी गेला. तर कित्येक जण जखमी झाले. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर आणि दहशतवादी विरोधी अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रत्नागिरीत एका संशयितास अटक केल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. 


     या संशयिताचे नाव शाहरूख असे असून त्याला उत्तर केरळापासून १००० किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरीत अटक करण्यात आली. साक्षिदारांच्या मदतीने पोलिसांनी त्याचे चित्र सर्वत्र वितरीत केल्यानंतर पोलिसांना हे यश मिळाले. 

     महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, ‘केरळा पोलिसांचे पथक रत्नागिरीत पोहोचले असून संशयित आरोपीस त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल.’

    या हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी ट्रेनमध्ये आपणच आग लावल्याची कबुली संशयित इसमाने दिली आहे. ट्रेनमध्ये वादावादी झाल्यानंतर अलप्पुझा - कन्नुर एक्सिक्युटिव्ह एक्सप्रेस ट्रेनला कोझिकोड जिल्ह्यातील इलातूर येथे आपण आग लावल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

     सदर संशयिताने ट्रेनच्या डी १ कंपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री ९.३० वाजता एका प्रवाशावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यामुळे डब्यात एकच घबराट उडाली. प्रवासी सैरावैरा पळू लागले. आग झपाट्याने पसरत चालल्यामुळे कंपार्टमेंटमधील आसने आणि लगेज आगीच्या भक्षस्थानी पडली.

     तीन लोक जागीच ठार झाले., तर अनेकजण भाजून जखमी झाले. पाच जणांना कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात तर इतर तिघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी किमान ३ महिला आहेत. 

     सदर ट्रेन थांबविण्यात आल्यानंतर रेल्वे कर्मचार्‍यांनी व स्थानिक लोकांनी आग विझवली. आगीने नुकसान झालेली बोगी वेगळी करून ती पुढील तपासासाठी कन्नूर स्टेशनला नेण्यात आली.