आधी ताई म्हणायचा नंतर... प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन केले मृतदेहाचे तुकडे, पुरावेही केले नष्ट;

Santosh Sakpal May 21, 2023 08:48 AM

गुगल सर्च हिस्ट्रीमुळे समोर आलं वास्तव


2020 साली घडलेल्या प्रकरणात संगीत शिक्षक असलेल्या प्रशांत नांबियारला जन्मठेप आणि अडीच लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  केरळ :काही दिवसांपूर्वीच आपण आफताब पूनावालाने त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरला कसं मारलं त्याची अत्यंत निर्घृण बातमी वाचली. अशीच एक घटना केरळमध्येही घडली. यामध्ये बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर तिचे तुकडे केले, तसंच तिच्या हत्येचे पुरावेही नष्ट केले. मात्र गुगल सर्च हिस्ट्रीने सगळं काही वास्तव समोर आलं. पोलिसांनी या खुन्याला अटक केली आहे. त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपण जाणून घेऊ काय घडली होती घटना?

2020 साली नेमकं

काय घडलं होतं?

अंगावर काटा आणणारी ही घटना आहे केरळच्या एका संगीत शिक्षकाची. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात या संगीत शिक्षकाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. हे प्रकरण आहे २०२० चं. त्यावेळी देशासह संपूर्ण जगात करोना पसरला होता. मात्र प्रशांत नांबियारने त्याची प्रेयसी सुचित्रा पिल्लईला याच काळात अत्यंत निर्घृणपणे ठार केलं. एवढंच नाही तर तिच्या प्रेताचे तुकडेही केले आणि सगळे पुरावेही नष्ट केले. पोलिसांनी मात्र गुगल सर्च हिस्ट्रीच्या आधारे हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं आहे.


प्रशांत नांबियारने त्याची प्रेयसी सुचित्राला ठार करण्यासाठी गुगलवर एक मजकूर शोधला होता. एका अध्यात्मिक गुरुने त्याच्या पत्नीला कसं मारलं? How Did Spiritual Guru Killed his wife? हे सर्च केलं होतं. त्यानंतर त्याने सुचित्राच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर प्रशांतने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे देखील गुगलवर शोधलं होतं. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने फुलप्रूफ प्लान तयार केला. सुचित्राची हत्या करण्याधी प्रशांत नांबियारने काही हत्यांवर आधारीत असणारे चित्रपटही पाहिले होते.


या प्रकरणात गुगल सर्च हिस्ट्रीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी प्रशांत नांबियारला कोल्लमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. नादुविलक्करा गावात राहणाऱ्या सुचित्रा पिल्लईच्या हत्येप्रकरणी कोर्टाने प्रशांत नांबियारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्याला अडीच लाखांचा दंडही ठोठावाला आहे. या दोघांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.

सुचित्राला  ताई म्हणत

होता नराधम प्रशांत


सुचित्रा आणि प्रशांत हे प्रियकर प्रेयसी होते खरे. मात्र सुरुवातीला सुचित्राला ताई म्हणून प्रशांत हाक मारत असे. हळू हळू तो तिच्या प्रेमात पडला. तसंच या दोघांमध्ये शारिरीक संबंधही प्रस्थापित झाले होते. मात्र २०२० मध्ये प्रशांत नांबियारने सुचित्रा पिल्लईची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तिला संपवलं. तसंच या सगळ्या तुकड्यांची विल्हेवाटही त्याने लावली.

ब्युटीशियन होती सुचित्रा पिल्लई

सुचित्रा पिल्लई ही ब्युटीशियन होती. तिची हत्या केल्यानंतर प्रशांत नांबियारने तिच्यासह सोशल मीडियावर केलेले सगळे चॅट्स डिलिट केले होते. तसंच सुचित्राचा मोबाईलही प्रशांतने नष्ट केला. मात्र फॉरेन्सिक टीमने तज्ज्ञांच्या मदतीने सुचित्राचे चॅट्स क्लाऊडवरुन रिकव्हर केले. यामध्ये या पथकाला व्हॉट्स अॅप चॅटही मिळाले. ही बाब या केससाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. यावरुन पोलिसांना हे समजलं की आरोपी प्रशांत नांबियार हा काही ना काही बहाण्याने पल्लकडला घेऊन जाऊ पाहात होता.

सुचित्रा पिल्लई ही प्रशांत नांबियारच्या पत्नीची मैत्रीण होती. प्रशांतने सुरुवातीला तिच्याशी फोनवरुन गप्पा मारल्या. तिचा विश्वास संपादन केला. तिच्यासह शरीर संबंधही प्रस्थापित केले. आपण कृत्रीम गर्भधारणेने मूल जन्माला घालू इच्छितो असं सुचित्राने प्रशांत नांबियारला सांगितलं होतं. मात्र यासाठी प्रशांत तयार नव्हता. सुचित्राने मूल जन्माला घातलं तर आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याने सुचित्राचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. Crime Tak ने हे वृत्त दिलं आहे.

 नेमका कसा केला?

प्रशांतने सुचित्राला पल्लकड या ठिकाणी एका भाड्याच्या घरात आणलं. तिथे त्याने सुचित्राचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर तिच्या गळ्याभोवती इमर्जन्सी लाइट केबल आवळली आणि तिची हत्या केली. त्यानंतर प्रशांत नांबियारने सुचित्राच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने जवळच असलेल्या एका शेतात पुरले. १७ मार्च २०२० ला सुचित्राने तिचं घर सोडलं होतं. २० मार्च २०२० ला तिचा कुटुंबाशी शेवटचा संपर्क झाला होता. तिच्या कुटुंबाने सुचित्रा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर कोट्टियम पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता.