कर्नाटक विधानसभा एक्झिट पोल्स: सर्व एक्झिट पोल्समध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ, मिळू शकतात १०० ते ११२ जागा

Santosh Sakpal May 10, 2023 07:00 PM

एक्सीस माय इंडिया ( Axis My India Exit Poll Results 2023), एबीपी-सीवोटर (ABP- CVoter Exit Poll Results 2023), लोकनिती-सीएसडीएस (Lokniti-CSDS Exit Poll Results 2023) आणि टुडे चाणक्य (Today's Chanakya Exit Poll Results 2023) यांच्यासह इतरही अनेकांचे एक्झिट पोल्सचे निकाल आपण येथे जाणून घेऊ शकता.



देशभरातील राजकीय वर्तुळासाठी यंदाचा मे महिन्या काहीसा अधिक गर्मगर्मीचा गेला. मे महिना तसा उन्हाळ्याचा महिना. वातावरण तापलेले. पण यंदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनीही हा महिना विशेष तापला. निमित्त ठरले कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023. कर्नाटक विधानसाभा निवडणूक 2023 साठी आज (10 मे) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान पार पडले. मतदानाची वेळ संपताच विविध एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर झाले आहेत. एक्सीस माय इंडिया ( Axis My India Exit Poll Results 2023), एबीपी-सीवोटर (ABP- CVoter Exit Poll Results 2023), लोकनिती-सीएसडीएस (Lokniti-CSDS Exit Poll Results 2023) आणि टुडे चाणक्य (Today's Chanakya Exit Poll Results 2023) यांच्यासह इतरही अनेकांचे एक्झिट पोल्सचे निकाल आपण येथे जाणून घेऊ शकता.
काँग्रेस बहुमताच्या जवळ, मिळू शकतात १०० ते ११२ जागा
एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ दिसत आहे. पक्षाला १०० ते ११२ जागा मिळू शकतात. तर भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ४१ आणि भाजपला ३८ टक्के जागा मिळू शकतात. एबीपी-सी व्होटर एक्झिट पोल निकाल- बीजेपी - ८३-९५ (३८ %) कॉंग्रेस- १००-११२ (४१ %) JDS- २१-३९ (१५ %) इतर- ०२-०६ (५%)

Times Now Exit Poll Result: काँग्रेसला बहुमत, भाजपला ७८-९२ जागा
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला बहुमत मिळू शकते. काँग्रेसला १०६ ते १२० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला ७८ ते ९२ जागा मिळू शकतात. भाजप- ७८-९२ जागा काँग्रेस- १०६-१२० जागा जेडीएस- २०-२६ जागा इतर- २-४ जागा

C Voter Exit Poll: कोस्टल कर्नाटकमध्ये भाजप १५ ते १९ जागांवर आघाडीवर आहे
सी-व्होटर एक्झिट पोलनुसार, कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपला काँग्रेसवर मोठी आघाडी मिळू शकते. या प्रदेशात विधानसभेच्या एकूण २१ जागा आहेत. येथे भाजपला १५ ते १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २ ते ६ जागा मिळू शकतात. येथे जेडीएसचे खाते दिसत नाही. कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपला ४९ टक्के आणि काँग्रेसला ३७ टक्के मते मिळू शकतात.

C Voter Exit Poll Result: जुन्या म्हैसूरमध्ये काँग्रेसने जेडीएसला मागे सारले
सी व्होटर-एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये जुन्या म्हैसूर भागात काँग्रेसने जेडीएसला मागे टाकले आहे. हा भाग आतापर्यंत जेडीएसचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागात विधानसभेच्या एकूण ५५ जागा आहेत. येथे काँग्रेसला २८ ते ३२ आणि जेडीएसला १९ ते २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य कर्नाटकातील ३५ जागांमध्ये काँग्रेसला १८-२२ तर भाजपला १२-१६ जागा मिळू शकतात. या भागात जेडीएसला ० ते २ जागा मिळू शकतात. ग्रेटर बंगळुरूमध्ये भाजपला १५ ते १९ जागा आणि काँग्रेसला ११ ते १५ जागा मिळू शकतात. या भागात जेडीएसला १-४ जागा मिळू शकतात.

ZEE एक्झिट पोल: काँग्रेस ४१, भाजप ३६ आणि JDS १७ टक्के मते
झी न्यूजच्या एक्झिट पोलने काँग्रेसला ४१ टक्के, भाजपला ३६ टक्के आणि जेडीएसला १७ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३८.४ टक्के आणि भाजपला ३६.२२ टक्के मते मिळाली होती. झी एक्झिट पोलने इतरांना ६ टक्के मतांचा अंदाज वर्तवला आहे.

ZEE-Matrize Exit Poll Result: काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, १०३-११८ जागा मिळू शकतात
झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. आकडेवारीनुसार काँग्रेसला १०३ ते ११८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला ७९ ते ९४ जागा आणि जेडीएसला २५ ते ३३ जागा मिळू शकतात. २ ते ५ जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार जेडीएसची भूमिका किंगमेकरची असू शकते.

सी व्होटर: ग्रेटर बेंगळुरूमध्ये भाजपला ४५ टक्के आणि काँग्रेसला ३९ टक्के मते
सी व्होटर-एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये ग्रेटर बेंगळुरू प्रदेशात भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. येथे भाजपला ४५ टक्के आणि काँग्रेसला ३९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी-सीवोटर एक्झिट पोल्स निकाल 2023

भाजपा : ८३-९५
काँग्रेस : १००-११२
जेडीएस : २१-२९
अन्य : २-६


रिपब्लिक-पी-एमआरक्यू एक्झिट पोल्स निकाल 

भाजप-85-100

काँग्रेस-94-108

Janata Dal (Secular) -24-32

इतर-2-4

एशियानेट न्यूज-जन की बात 

भाजप-94-117

काँग्रेस-91-106

Janata Dal (Secular) - 14-24

इतर- 0-2

TV9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅट

भाजप- 88-98

काँग्रेस- 99-109

Janata Dal (Secular) -21-26

इतर-04

सुवर्ण न्यूज-जन की बात
काँग्रेस : ९१-१०६
जेडीएस : १४-२४
अन्य : ०-२

झी न्यूज-मॅट्रिझ एक्झिट पोल्स निकाल 2023 (Zee News-Matrize Exit Poll Results 2023)

भाजप- 79-94

काँग्रेस- 103-118

Janata Dal (Secular) - 25-33

इतर-2-05

झी न्यूज आणि मॅट्राईजच्या एक्झिट पोलनुसार 

भाजपा : ७९-९४
काँग्रेस : १०३ – ११८
जेडीएस : २५-३३
अन्य : २-५