कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची फौज

Santosh Gaikwad April 13, 2023 07:09 PM


मुंबई :  कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून १० मे राजी मतदान व १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच इतर प्रचारकांची एक मोठी फौज उभी केली आहे. हे प्रचारक कर्नाटकातील विविध मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतील. 

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रचारकांच्या यादीत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रमेश बागवे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआमचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्यासह सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते व पदाधिकारी यांची ५१ सदस्यांची टीम बनवली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करतील.