कल्याण रेल्वे स्थानकातून ५४ स्फोटके जप्त

Santosh Gaikwad February 21, 2024 11:37 PM


कल्याण :  कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्सकल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेतरेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहेपोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन खोके आढळलीत्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने   लोहमार्ग पोलिसांना दिलीकल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटीलकल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळलोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आलेश्वानाच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आलीही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होतीती कोणी आणून ठेवलीस्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होताअशा विविध बाजूने पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे.

 खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी वापर 

ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठीविहिरी खोदण्यासाठी वापरली जातातअशा क्षमतेची आहेतया स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाहीती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतातत्यांना वात असतेती स्फोटकां शिवाय स्फोट करत नाहीततरीही ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहेअसे लोहमार्ग पोलीसांकडून सांगण्यात आलेही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावात्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावाअसाही तर्क पोलिसांकडून काढला जात आहे.