पेहलगाम येथील निष्पाप मृत नागरिकांना कांदिवली येथे सर्व धर्मिंयांकडून श्रद्धांजली..!

Santosh Sakpal April 28, 2025 12:34 PM

मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर )

जम्मू - काश्मीर येथील पेहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आज कांदिवली येथे सर्व धर्मिंयांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली येथील समता क्रीडा भवन येथे सर्व धर्मीय व सर्व पक्षीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनासभेत ख्रिश्चन समाजाचे फादर एन्जोलो, बुद्ध भन्ते लामा, भन्ते कश्यप, बोहरा समाजाचे अमीन साहेब शेख जुझरभाई बोरीवाला, जैन समाजाचे मुनिवर्य प.पू. पारिजात विजय महाराज, वैष्णव समाजाचे पूज्यपात १०८ श्री. गोपीशकुमार महाराज, शीख समाजाचे मा. मनमोहन सिंह व सन्तोक सिंह उपस्थित होते. सर्व धर्मीय व सर्व पक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करून देशातील शांती एकता व मानवतेचा संदेश दिला. याप्रसंगी माजी खा. गोपाळ शेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, शिवसेना विभागप्रमुख विशाखा मोर्ये, शाखाप्रमुख प्रकाश गिरी, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्मिता बेंद्रे, पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाविस्कर, माजी नगरसेवक दिपक (बाळा) तावडे, कमलेश यादव, ॲड. प्रतिभा गिरकर इतर पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.