इरशाळवाडीतील मुलामुलींनी लुटला मनमुराद खरेदीचा आनंद

Santosh Gaikwad November 10, 2023 07:45 PM


पुणे दि.१०: दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, पर्स, मिठाई असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण, ज्यांच्या वाट्याला हे भाग्य नाही अशा इरशाळवाडीतील अनाथ मुलामुलींनी धनत्रयोदशी या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुळशीबागेत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सोबत मनमुराद खरेदीकरत दिवाळी साजरी केली.


राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट, तुळशीबाग गणपती मंडळ ह्यांच्या माध्यमातून आणि जय गणेश व्यासपीठ यांच्यातर्फे दिवाळी निमित्त दरडग्रस्त इरशाळवाडीतील मुलामुलींसाठी 'पुण्याची दिवाळी सहल आणि आनंद मेळा' ह्या उपक्रमाचे आयोजन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. 

 


यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार निरशाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी तात्काळ उपयोजना अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अशा परिस्थितीतही त्यातील मुला-मुली पुन्हा शाळेत जाळायला लागले आहेत त्यांनी शिकून मोठं व्हावं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं करियर घडवावं त्यासाठी आवश्यक ती मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. 


तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाने अत्यंत प्रमाणे या सर्व मुलांचे आदरातिथ्य केले आहे. दिवाळीनिमित्त खरेदीचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असेच आपण सर्व या मुलांच्या घरातील सदस्य असल्या सारखे कायम त्यांच्या सोबत राहुयात.


इरशाळवाडीतील जवळपास ४५ मुलेमुली यावेळी उपस्थित होते. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना बिस्कीट, ड्रायफ्रूट, वेफर्स, चॉकलेट आदी वस्तू दिल्या. 


*पुणे पोलिसांचे केले अभिनंदन*


तुळशीबाग येथे अनेक देव देवतांची वास्तव्य आहे. मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. अशा परिसराचे  संदीप गिल डीसीपी आहेत ही त्यांचं भाग्य आहे. गणेशोत्सव काळात देखील त्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा झाला. दहशतवाद्यांचे गैरकृत्य रोखण्याचे काम पुणे शहर पोलिसांनी केले आहे त्याची एनआयए NIA ने दखल घेत पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. याबाबत पुणे शहराचे आयुक्त त्यांचे सर्व अधिकारी, कॉन्स्टेबल यांचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 

------