IPS आशुतोष डुंबरे ठाण्याचे नवे पोलिस आयुक्त

Santosh Gaikwad December 11, 2023 11:23 PM

मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य पोलीस महासंचालक श्रेणीत पद अवनत करुन ही बदली करण्यात आली आहे. जयजीत सिंह यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे.

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजला जातो. त्यामुळे ठाण्याचे पोलीस आयुक्त महत्वाचे पद आहे. अखेर आशुतोष डुंबरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. आशुतोष डुंबरे हे १९९४  बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

आयपीएस अधिकारी जयजीत सिंह दोन वर्षांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांची पदोन्नतीही झाली आहे. डुंबरे यांनी यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त पद भूषवले आहे.