भारतीय अजूनही त्यांच्या घरांच्या रक्षणासाठी शेजाऱ्यांवर खूप अवलंबून; गोदरेज लॉक्सच्या ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्री’ अभ्यासातून असे दिसून आले आहे की ४९% भारतीय अजूनही त्यांच्या चाव्या शेजाऱ्यांकडे ठेवतात

Santosh Sakpal January 23, 2024 11:31 PM

 

मुंबई,: सांस्कृतिक संदर्भातभारतीयांना नेहमीच विविध गोष्टींसाठी त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून राहण्यासाठी ओळखले जाते आणि मुख्य दरवाजाची एक अतिरिक्त किल्ली शेजाऱ्यांकडे सोपवणे ही अशीच एक बाब आहे. परंतु सध्याच्या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या  बदलत्या परिस्थितीत अजूनही हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे काअशा प्रकारचे ग्राहकांचे वर्तन समजून घेण्यासाठी गोदरेज लॉक्सने अलिकडेच ‘लिव्ह सेफलिव्ह फ्री’ नावाच्या संशोधन अभ्यासाचा निष्कर्ष काढला आहे.

 

गोदरेज समुहाची प्रमुख कंपनीगोदरेज आणि बॉयसचे एक व्यावसायिक युनिट गोदरेज लॉक्सने हा अभ्यास गृह सुरक्षा दिनाच्या निमित्ताने त्यांच्या वार्षिक उपक्रमांचा एक भाग म्हणून केला होताभारतीय ग्राहक आपल्या घराच्या सुरक्षिततेचे पर्याय अपग्रेड करण्यासाठी काय विचार करतात याबद्दल माहिती घेणे हा या अभ्यासाचा उद्देश होता.

 

अहवालात असे म्हटले आहे की या संशोधन अभ्यासात भाग घेतलेल्या जवळजवळ अर्ध्या (49%) प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की जर ते बाहेर जाऊन काम करणारे पालक असते तर त्यांनी त्यांच्या मुलाला घरात जाता येण्यासाठी शेजारीनातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्याकडे आणखी एक किल्ली देवून ठेवली असती. त्याचप्रमाणेअर्ध्याहून अधिक (56%) प्रतिसादकर्त्यांचे म्हणणे हे होते की ते सोयीसाठी त्यांच्या चाव्या शेजाऱ्याकडे सोपवू शकतात.

 

पुन्हाजवळपास निम्म्या प्रतिसादकर्त्यांनी (46%) सांगितले कीरात्री उशीर झाला तरीही कुटुंबातील सदस्यासाठी एक चावी त्यांच्या शेजार्‍याकडे ठेवण्यास त्यांना सोयीस्कर वाटेलतर एक चतुर्थांश (26%) पेक्षा जास्त लोकांनी दावा केला की जर त्यांना घराबाहेर राहावे लागले असेल तर त्याचे कारण ज्या शेजाऱ्यांकडे किल्ली ठेवली तेच घरात नसणे हे असू शकते.

 

गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “पूर्वीच्या बहुतांश समाज घटकांमध्ये आपल्या शेजाऱ्यांना चांगले ओळखणे इतपत गोष्टी मर्यादित नव्हत्या तर शेजार म्हणजे विस्तारित कुटुंबच असायचे. आणि त्यामुळे अशा प्रकारे शेजऱ्यांवर अवलंबून असणे ही सर्वसाधारण गोष्ट होती. पण आता जग झपाट्याने बदलले आहेविशेषत: शहरी आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये लोक कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वरचेवर घराबाहेर असतात आणि तुलनेने वेगवान जीवन जगतात. आजच्या जगात आपल्या घरांच्या सुरक्षेसाठी शेजाऱ्यांसह बाहेरच्या घटकांवर अवलंबून राहणे योग्य नाही. गोदरेज मध्ये आम्ही नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे आणि सतत नवनवीन कल्पनांवर काम केले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीशी जुळण्यासाठी त्यांच्या घराच्या कुलूपात सुधारणा करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. आमच्या अत्याधुनिक नवकल्पना जसे की CIOT डिजिटल लॉक्स आधुनिक ग्राहकांना त्यांच्या दाराच्या कुलूपांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी कधीही नव्हते एवढे सक्षम करतात. जादाची किल्ली ही गोष्ट आता तितकीशी महत्त्वाची राहिलेली नाही कारण या नावीन्यपूर्णतेमुळे आपल्याला फोनद्वारे मुख्य दरवाजा उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला हे दिसून आले आहे की भारतीय ग्राहकांनी अधिक तंत्रज्ञान सक्षम उपायांची निवड करत त्यांच्या घरांच्या इतर पैलूंमध्ये आधीपासूनच सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे आणि मुख्य दरवाजाच्या कुलूपांपर्यंत लवकरच याचा विस्तार होईल याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत.”

 

सुरक्षितता आणि सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट घरगुती उपकरणे यांचा अवलंब करण्याबाबत मानवी वर्तन समजून घेण्याच्या उद्देशाने ‘लिव्ह सेफलिव्ह फ्री’ हा अभ्यास करण्यात आला. मुंबईदिल्लीकोलकाताबंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांचा समावेश असलेल्या २,००० लोकांमध्ये हा संशोधन अभ्यास करण्यात आला.