भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे व्हिजिलन्स अवेयरनेस वीक २०२३ चे उद्घाटन

Santosh Sakpal October 31, 2023 07:11 PM

मुंबई,  – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या प्रतिष्ठित महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने व्हिजिलन्स अवेयरनेस वीक २०२३ चे (व्हीएडब्ल्यू -२०२३) आज आपल्या कॉर्पोरेट कार्यालयात उद्घाटन केले. भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्राप्रती बांधील राहा अशी संकल्पना असलेला हा सप्ताह ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान राबवला जाणार आहे. बीपीसीएलने या सप्ताहादरम्यान संपूर्ण कॉर्पोरेशनमध्ये सतर्कता व जागरूकतेचा प्रसार करत पॅन भारतातील कर्मचाऱ्यांना त्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. 

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे पदी श्री. संजय भाटिया आयएएस, उप- लोकआयुक्त, महाराष्ट्र उपस्थित होते. त्याशिवाय या वेळी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांमध्ये श्री. कृष्णकुमार, सीअँडएमडी, श्रीमती. मीनाक्षी रावत, आयईएस, प्रमुख व्हिजिलन्स अधिकारी, श्री. व्ही. आर. के. गुप्ता, संचालक- वित्त, श्री. सुखमल जैन, संचालक, - विपणन, श्री. राजकुमार दुबे, संचालक एचआर, श्री. एस. श्रीकांत, व्यवस्थापक (व्हिजिलन्स) आणि बीपीसीएलच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

उद्घाटनादरम्यान मुंबई व जवळपासच्या परिसरातील बीपीसीएलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाइव्ह वेबकास्टद्वारे सचोटीची शपथ घेत प्रामाणिक राहाण्याची बांधिलकी दर्शवली. 

उद्घाटनपर भाषणात बीपीसीएलच्या सीव्हीओ श्रीमती मीनाक्षी रावत यांनी पीआयडीपीआयचे (प्रीव्हेन्शन, आयडेंटिफिकेशन, डिटरन्स, पनिशमेंट अँड डिस्पोजल ऑफ कम्प्लेन्ट्स) महत्त्व आणि पारदर्शकता राखण्यासाठी कंपनीच्या व्हिसल ब्लोअर धोरणाचा पुनरूच्चार केला. त्यांनी चौकशी अधिकारी आणि प्रेझेटिंग अधिकारी यांच्यासाठी क्षमता बांधणी महत्त्वाचे असल्याचे नमूद करत तक्रार व्यवस्थापन यंत्रणेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले. 

बीपीसीएलचे सीअँडएमडी श्री. कृष्णकुमार म्हणाले, विचार आणि कृतीमधला प्रामाणिकपणा गेल्या कित्येक वर्षांपासून बीपीसीएलच्या प्रतिमेचा आधारस्तंभ आहे. न्याय्य व प्रामाणिक पद्धतींची ही परंपरा आमचे कर्मचारी पुढे नेतील असा विश्वास वाटतो. व्हीएडब्ल्यू- २३ च्या प्रसंगी एकत्र येऊन आपल्या सर्व कृती मूल्यांनुसार असतील आणि विश्वास हा आपल्या अस्तित्वाचा पाया असेल ही बांधिलकी नव्याने अधोरेखित करूया.  

प्रमुख पाहुणे संजय भाटिया यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनुभव मांडत कंपन्यांमध्ये तीव्र पारदर्शकतेची गरज असल्याकडे लक्ष वेधले. वैयक्तिक बदलांसाठी ध्यानधारणा आवश्यक असून कोणतेही उद्दिष्ट साकार करण्यासाठी अंतर्गत बदलाची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

याप्रसंगी व्हिजिलन्स प्लस न्यूजलेटरच्या १९ व्या आवृत्तीचे आणि काँम्पेडियम ऑफ सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन सर्क्युलर्स आणि मार्गदर्शक तत्वांचे संजय भाटिया, लोकायुक्त महाराष्ट्र यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी स४व संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.