आमदार गोळीबारप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार : फडणवीस

Santosh Gaikwad February 03, 2024 01:49 PM


मुंबई :- भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले. 


 भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.  इतर तिघांचा शोध सुरू आहे. एफआयआरमध्ये आयपीसी आणि आर्म्स ॲक्टची कलमे लावण्यात आली आहेत. 


कुणीही कायदा हातात घेऊ नये : अजित पवार 


 गोळीबाराच्या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पवार म्हणाले, वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कोणाहीबद्दल माझी काही तक्रार असेल, तर मी ती पोलीस स्टेशनला देईन. संबंधित घटनेबद्दलदेखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे असेही पवार म्हणाले. 

-----