फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील ! शरद पवारांचा खोचक टोला

Santosh Gaikwad June 26, 2023 03:10 PM


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. मात्र फडणवीस यांच्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील असा खोचक टोला लागलाय.


 शरद पवारांना उद्देशून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी १९७७ च्या सरकार स्थापनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी आणि शरद पवार यांनी केलं तर मुत्सद्देगिरी असं म्हणत फडणवीस यांनी पवारांवर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेचा पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. 


पवार म्हणाले, 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी ते (फडणवीस) लहान मुलं असतील. त्यामुळे त्यांना कदाचित ते कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहित नसेल. 

 

मी जे सरकार बनवलं तेव्हा सर्वांना घेऊन बनवलं होते. कदाचित ते त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं वक्तव्य करत असतील, यापेक्षा जास्त यावर भाष्य्य करण्याची गरज नाही, असा खोचक टोला शरद पवारांना फडणवीसांना लगावला आहे.