*पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट*

Santosh Sakpal April 27, 2025 09:44 PM

मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)

जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगताना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगून त्याना याबाबत आशवस्त केले. यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असेही सांगितले. 

यावेळीकल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.