जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्भरात आंदोलन !

Santosh Gaikwad May 22, 2023 11:44 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या मागील बाजूस ईडीचे कार्यालय असल्याने जयंत पाटील हे पायी चालत ईडी कार्यालयात गेले. यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  दरम्यान  या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत असून राज्यभर आंदोलन केले जात आहे. 


जयंत पाटील  यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आव्हान केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.


राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली असून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते कार्यालयाबाहेर मोठया संख्येने जमले आहेत. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, औरगांबाद राज्यातील विविध भागात आंदोलन सुरू आहे. ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे.दरम्यान प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकत्यांनी मोठया संख्येने गर्दी केल्याने कार्यकत्यांच्या गराडयातून पाटील हे पायी चालत ईडी कार्यालयात पोहचले पोलिसांनी बॅरिगेटींग लावून कार्यकत्यां अडविले.