‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ या सोनी सबवरील आगळ्यावेगळ्या मालिकेने ध्रुव (ईशान धवन) आणि ताराप्रिया(रिया शर्मा) या भिन्न युगातील दोन व्यक्तींची एक अनोखी प्रेमकथा प्रकाशात आणली आहे. पदार्पणाच्या अवघ्या दोन महिन्यातच, मालिकेने त्याचे मोहक कथानक तसेच, ध्रुव आणि तारामधल्या लोभस क्रमिस्ट्रीने प्रेक्षकांना यशस्वीरीत्या मोहित केले आहे. आगामी भागांमध्ये, या दुर्दैवी प्रेमी जीवांचा प्रवास १७ व्या शतकात जाऊन पोहोचलेला दिसेल. येथे त्यांचे प्रेम फुलून येण्यासाठी नवीन शक्यता खुल्या होतील.
या आठवड्यात, ध्रुव आणि ताराच्या प्रवासात एक अनपेक्षित वळण आलेले दिसेल. ते एका घनदाट जंगलात हरवलेले दिसतील. तरुण (अमित पचौरी) त्यांचे अपहरण करतो त्यामुळे त्यांची परिस्थिति आणखीनच बिकट होते.
तथापि, त्यांचे नशीब पालटते कारण नवरंग वन या पुस्तकात त्यांना त्यांच्या दुर्दशेचा एक महत्वाचा संकेत सापडतो ज्यामुळे १७व्या शतकाकडे नेणारे कोडे उलगडते. त्यांच्या दुर्दैवाने, १७व्या शतकात पोहोचताच, एक नवे आव्हान उभे ठाकते, ते दोघे एकमेकांपासून अलग होऊन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. शिवाय, ध्रुवचा जीव धोक्यात आला आहे, या जीवघेण्या परिस्थितीतून त्याची कोण सुटका करेल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहील.
17 व्या शतकातील या पहिल्या मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ध्रुवचा तारणहार कोण असेल?
ध्रुवची भूमिका साकारणारा ईशान धवन म्हणतो, “शेवटी ध्रुव १७व्या शतकात पोहोचला याचा मला आनंद आहे आणि एक कलाकार म्हणून माझ्या व्यक्तिरेखेचे नवीन आयाम शोधण्याचा हा एक रोमांचक टप्पा आहे. ध्रुव १७व्या शतकात पोहोचताच, आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या एका नवीन आव्हानाला त्याला सामोरे जावे लागले आहे. ही एक जीवघेणी परिस्थिति आहे आणि प्रेक्षक एक थरार अनुभवत आहेत. मला वाटते, ध्रुवने ताराच्या
प्रेमाने पूर्णतः प्रेरित होऊन आणि एक डॉक्टर म्हणून त्याच्या कर्तव्याची जाण ठेवून ताराबरोबर १७व्या शतकात जाण्याचा एक धाडसी आणि हृदयस्पर्शी निर्णय घेतला आहे. हा एक आनंददायी प्रवास असेल आणि आम्हाला चित्रीकरण करताना जितका आनंद वाटला, तेवढाच आनंद प्रेक्षकांना मालिका पाहताना देखील होईल अशी मला आशा आहे.”
पाहायला विसरू नका ‘ध्रुव तारा – समय सदी के परे’, सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर!