रिपब्लिकन पक्षाच्यावतीने जोगेश्वरीत दि.६ मार्च रोजी दलित-मुस्लिम एकता परिषद

Santosh Gaikwad March 04, 2024 04:37 PM


मुंबई दि  - रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या बुधवार दि.६ मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जोगेश्वरी पश्चिम, एस.वी रोड,एम.टी एन एल समोर, किल्लेदार ग्रांऊड येथे दलित मुस्लिम एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले करणार आहेत.तसेच या दलित मुस्लिम एकता परिषदेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार,स्थानिक खासदार गजानन किर्तीकर,स्थानिक आमदार भारती लव्हेकर,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस  अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे,सिध्दार्थ कासारे,प्रकाश जाधव,फारूख दळवी,अभीनेत्री पायल घोष,वकार खान,अभिनेता अली खान,मुस्ताकबाबा उषा रामळू आदि अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती या दलित-मुस्लिम एकता परिषदेचे आयोजक रिपाइं चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सोहेल शेख यांनी दिली आहे.


                                     

रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे. केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सदैव दलित मुस्लिमांच्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून दिला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तीन तलाक कायदा रद्द करुन मुस्लिम महिलांना न्याय दिला आहे.सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम मोदी सरकार करित आहे. केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे सतत दलित-मुस्लिमांच्या न्याय हक्कासाठी लढत आले आहेत त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना धन्यवाद देणारा ठराव दलित-मुस्लिम परिषदेत करण्यात येणार आहे. रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत आयोजित केलेल्या या दलित-मुस्लिम एकता परिषदेत रिपाइंचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सोहेल शेख यांच्या वतीने दलित-मुस्लिमांची एकजुट घडविणारे नेते म्हणून ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

धन्यवाद आठवलेसाहेब या नावाने मोहिम सुरु करुन दलित मुस्लिमांच्या घरोघरी ना.रामदास आठवले यांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती पोहोचविण्यात येणार असल्याचे दलित-मुस्लिम एकता परिषदेचे संयोजक सोहेल शेख यांनी दिली आहे.