मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली​ ; ​लोकसभेत राहुल गांधी आक्रमक !

Santosh Gaikwad August 09, 2023 04:32 PM


नवी दिल्ली:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खासकरून मणिपूरच्या हिंसेच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं.  मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली, अशी खरमरीत टीका राहुल गांधींनी केली आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते तिथे गेले नाहीत, पण मी मणिपूरला गेलो. मी आता मणिपूर या शब्दाचा उच्चार केला. पण तुम्ही मणिपूर हे राज्य ठेवलंच नाही. मणिपूरचे तुम्ही दोन तुकडे केले आहेत. भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केली. या लोकांनी फक्त मणिपूरच नाही, तर संपूर्ण देशाचा खून केला आहे, तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात, तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी चढवला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी परत मिळाल्यानंतर संसदेत दमदार एन्ट्री घेतली आहे. मणिपूरच्या धगधगत्या विषयावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते मणिपूरला गेले नाहीत, पण मी तिथे गेलो. मणिपूर तोडून तुम्ही त्याचे दोन भाग केलेत, भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केली, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. भारत आपला आवाज आहे. आपल्या जनतेचा आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही (भाजप)ने मणिपूरमध्ये केली आहे. याचा अर्थ तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमधील नागरिकांना मारुन तुम्ही भारताची हत्या केली आहे. तुम्ही देशभक्त नाही तर देशद्रोही आहात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी भाजपवर केला आहे. राहुल गांधींनी मोदी सरकारवर हा आरोप केल्यानंतर लगेचच संसदेत मोठा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधीना विरोध केला.


राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला : स्मृती ईराणी​चा आरोप 


केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात ​यावी अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे. 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेऊन तक्रारही केली आहे.​ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चे​त मणिपूरच्या हिंसेच्या मुद्द्यावरून​ आक्रमक होत त्यांनी ​मोदी सरकारला घेर​ल्यानंतर मंत्री स्मृती ईराणी या भाषणाला उभ्या राहिल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. स्मृती ईराणी बोलत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. ​ राजस्थानला जाण्यासाठी ते सभागृहाबाहेर पडले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती ईराणी यांनी केला. राहुल गांधी हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांनी ही कृती केल्याचं सांगितलं जातं. राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली पडल्या. त्यामुळे या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असता त्यांना पाहून भाजपचे खासदार हसायला लागले. त्यावर राहुल गांधी यांनी या हसणाऱ्या खासदारांना फ्लाईंग किस दिला आणि तिथून हसत निघून गेले, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
​