अवकाळी पावसाने शेती नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

Santosh Gaikwad November 27, 2023 10:10 PM

मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठं नुकसान झाल्याने या नुकसानीचे तातडीने पंचनाम करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

   अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा यासहित इतर जिल्हांनाही तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. तसेच शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.   बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतमालाचं प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी केंद्रीय माहिती संवाद आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे.