मुख्यमंत्री म्हणाले, मी सुट्टीवर नाही, डबलडयुटीवर ....

Santosh Gaikwad April 26, 2023 06:15 PM

 मुंबई दिनांक २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत मी सुट्टीवर नाही तर डबलडयुटीवर आहे असे उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा दौ-यावर असून या दौ-यात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला आहे. 


 मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले.

---