बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धेत रीयांश, अर्जुन, सिध्देश विजेते

Santosh Sakpal August 14, 2023 09:59 AM

MUMBAI:-     आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या बँक ऑफ बडोदा-बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धेमध्ये ८ वर्षाखालील गटात रीयांश बोराटेने, १० वर्षाखालील गटात अर्जुन सिंगने व १४ वर्षाखालील गटात सिध्देश पनसारीने रुपये तीन हजार पुरस्कारासह विजेतेपद पटकाविले. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ११० खेळाडूंमध्ये आरएमएमएस, परेल, मुंबई-१२ येथे स्विस लीग पध्दतीने बुध्दिबळ स्पर्धा रंगली. बँक ऑफ बडोदाचे असिस्टंट जनरल मॅनेजर घन श्याम दास, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


   बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग, आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत बुध्दिबळ स्पर्धेमधील ८ वर्षाखालील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित रीयांश बोराटेने (४ गुण) प्रथम, दर्श राऊतने (४ गुण) द्वितीय, नचिकेत अय्यरने (४ गुण) तृतीय, निवान छेडाने (३.५ गुण) चौथा, जाश शाहने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये नित्या बंगने (४ गुण) प्रथम पुरस्कार जिंकला. १० वर्षाखालील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित अर्जुन सिंगने (५ गुण) प्रथम, सोहम चिखलकरने (४ गुण) द्वितीय, वेदांत साळवीने (४ गुण) तृतीय, यश टंडनने (३ गुण) चौथा, अक्षज पौडेलने (३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये वारी गोगरीने (४ गुण) प्रथम स्थान मिळविले. १४ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सिध्देश पनसारीने (४.५ गुण) प्रथम, सिध्दांत खेतानने (४ गुण) द्वितीय, सार्थक प्रसादने (४ गुण) तृतीय, ध्रुव जैनने (३.५ गुण) चौथा, वेदांत मस्केने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये अनिशा शेखने (२ गुण) प्रथम पुरस्कार पटकाविला.


*********************************************************************