भिवंडीत इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू : ११ जणांची सुटका

Santosh Gaikwad April 29, 2023 06:16 PM

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे,  ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ९ रहिवाशांची सुटका करण्यात आली असून, त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या इमारतीच्या ढिगा-याखाली २२ जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ढिगा-याखालून ११ रहिवाश्यांच्या सुखरूप सुटका करण्यात आली असून, ०२- रहिवाश्यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. नवनाथ सावंत (पु./वय- ४० वर्षे), लक्ष्मीदेवी रवी म्हातो (स्त्री./वय- २६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. 


 मिळालेल्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता आहे. 


सदर घटनास्थळी प्रांत अधिकारी, तहसिलदार-भिवंडी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-ठाणे महानगरपालिका, ग्रामसेवक-भिवंडी ग्रामीण,पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२, भिवंडी पोलीस कर्मचारी, दंगल गृहस्थ पोलीस, शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडीचे कर्मचारी-१० रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान-०१ इमर्जन्सी टेंडर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकारी कर्मचारी ०१-आयशर टेम्पोसह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान-०१ बस वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी बचाव कार्य करीत आहेत. ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे   व भिवंडी मनपाच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे घटनास्थळी उपस्थित आहेत.