बंद एनटीसी गिरण्या,चाळींच्या घरांच्या प्रश्नावर सचिन अहिर यांची दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा!

Santosh Sakpal December 23, 2023 07:41 PM

  मुंबई दि.२३: बंद एनटीसी गिरण्या आणि गिरण्यांच्या चाळींच्या जागेवरील घरांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी दिल्ली वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक आशुतोष गुप्ता आणि वस्त्रोद्योग सचिवही उपस्थित होते.

     मुंबई,महाराष्ट्रास देशभरातील २३ एनटीसी च्या गिरण्या गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळा पासून बंद असून कामगा रांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही,असे सचिन अहिर यांनी सांगितले.    

   वस्त्रोद्योग महामंडळा च्या गिरण्यांबाबत नॉनसे स गिरण्या सेस मध्ये बदलण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारने चाळींच्या बाकी असलेल्या सेसची रक्कम एटीसीने भरावी,असे बैठकीत सूचित करण्यात आले आहे‌. सचिन अहिर यांच्या प्रश्नावर वाणिज्य मंत्रालय यांनी सांगितले,सदरबाब ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या आधिन आहे,ती लवकरच सोडविण्यात येईल.तसेच येणाऱ्या काळात केंद्र सरकारचे सचिव व महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाचे सचिव यांची एक बैठक प्रस्तावित आहे.या बैठकीत वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्वसना संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यात येईल,असेही बैठकीत सांगण्यात आले.अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या या भेटीने दोन्ही प्रश्नांना चालना मिळाली आहे,असे सरचिटणीस गोविंद राव मोहिते यांनी म्हटले आहे.•••