हिंगोलीत बाबूराव कोहळीकर शिवसेनेचे नवे उमेदवार !

Santosh Gaikwad April 03, 2024 10:04 PM


 
हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच,   हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेकडून जाहीर केलेल्या हेमंत पाटील यांनी भाजपकडून विरोध होत होता. त्यामुळेच उमेदवार बदलल्याची माहिती समोर येत आहे. 

महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत हिगोली मतदारसंघाचा समावेश असून हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली होती.  हिंगोली मतदारसंघातून जाहीर झालेल्या हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून प्रचंड विरोध केला जात होता. त्या विरोधानंतर म्हणजेच भाजपच्या दबावानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करत बाबूराव कदम कोहळीकर उमेदवारी जाहीर केली आहे.