मुंबईच्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये धुमधडाक्यात भीमजयंती साजरी

santosh sakpal April 18, 2023 01:03 PM

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मुंबई माटुंगा भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळेस माटुंगा भागात भीम जयंतीच्या अगोदर मोठ्या उत्साहात महिला बाईक रॅलीचा कार्यक्रम करण्यात आला होता. भीम जयंतीच्या दिवशी मिरवणुकीसाठी खुल्या ट्रकवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ठेऊन मोठ्या प्रमाणात फुल सजावट व रोषणाईची डेकोरेशन करण्यात आले  तसेच मोठ्या भीम जनसमुदाय समोर स्थापना व पुजा करण्यात आली. ह्या स्थापन कार्यक्रमाला माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, वार्ड क्र.१८९ ची माझी नगरसेवका हर्शलाताई मोरे, झोन नं ५ डी.सी.पी. मनोज पाटिल, माहीम विभागातील ए.सी.पी. श्री. दिपक देशमुख, शाहू नगर पोलीस ठाणेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र कांबळे, पी.आई सचिन शिर्के, अमृत कादबाने, श्रीशैल्य चिवडशेट्टी, समाज सेवक आशिष मोरे, आनंद लोंढे, भारत कांबळे, उद्य साळवी, आर.डी.पडित, सावकार कांबळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. भीम जंयतीच्या आदल्या दिवशी महिला बाईक रॅली ही माटुंगा ते दादर चैतन्यभुमी पर्यत अतिसुदंर व शाततेने पार पाडण्यात आले. 
ह्या उत्सवाच्या दरम्यान माटुंगा परिसरात अतिशय सुंदर पध्दतीने सजवण्यात आले होते. व विभागातील असलेली मंडळानी डाॅ बाबासाहेब आंबेडकरच्या सुदंर प्रतिमा होर्डिग्जच्या साह्याने लावण्यात आले होते. तसेच अशा ह्या जयंती निमित्त संकल्प, रॉयल वेल्फेअर, आणि यशस्वी असोसियेशन तर्फे पाणी वाटप, अल्पोपाहार वाटप. कोल्ड्रिंक वाटप ह्या आलेल्या भीम समुदायाला करत होते. तसेच अशा भीम जयंती मिरवणूकीत फटाके आतिषबाज करण्यात आली व बेन्जो, बॅन्ड पार्टी, ढोल ताशाच्या आवाजाने परिसरात घुमत होता. अशा ह्या सुंदर वातावरणात मुख्य म्हणजे महिला मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी होत्या. ह्था मिरवणूक कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष आरती लोंढे, सेक्रेटरी दिपमाला खरात, खजिनदार सुषमा देठे, कार्याध्यक्ष नानकिताई व इतर सहकार्याने मिरवणूक पार पाडण्यात आले.