अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला भाजपच्या वाटेवर ?

Santosh Gaikwad February 12, 2024 07:23 PM


मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे  नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू होती. मात्र हि चर्चा सत्यात उतरणार असल्याची दिसून येत आहे. आज अखेर अशोक चव्हाण  काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभा   निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या चव्हाणांसोबत अंदाजे १५ आमदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांच्यात महत्वाची बैठक झाली. यावेळी तिन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क करण्यात येत आहे. 

माझा निर्णय दोन दिवसात जाहीर करीन : चव्हाण

याबाबत माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की मी आज माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे माझा कोणावरही राग नाही काँग्रेसमध्ये मी आज पर्यंत प्रामाणिकपणे काम केलं मी माझा निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर करीन फक्त दोन दिवस थांबा असे ते म्हणाले