अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभेचे संकेत !

Santosh Gaikwad February 13, 2024 01:51 PM


मुंबई :राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात हात सोडत मंगळवारी भाजपमये प्रवेश केला.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे त्यामुळे फडणवीसांकडून चव्हाणांच्या राज्यसभेचे संकेत देण्यात आले आहेत. 


अशोक चव्हाण यांनी सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी आमदारकिचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चव्हाण यांचे भाजप प्रवेशावर शिक्कामेार्तब झाले होते. अखेर मंगळवारी चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का समजला जात आहे.


   मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे. काँग्रेसी विचारांचा प्रभाव असलेल्या अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हेदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे लहानपणापासूनच अशोक चव्हाण यांना घरातच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले.