रेडिओचा प्रसिद्ध आवाज हरपला !

Santosh Gaikwad February 22, 2024 08:52 AM


मुंबई : ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवार रात्री हृदय विकाराच्या झटक्याने तीव्र निधन झाले ते 91 वर्षाचे होते. रेडिओ म्हणजे अमीन सयानी अशी जणूकाय ओळखच बनली होती. रेडिओचा प्रसिद्ध आवाज हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


मुंबई १९३२ मध्ये गुजराती कुटुंबात अमीन सयानी यांचा जन्म झाला रेडिओशी त्यांची नाळ त्यांचे बंधू हमीद सयानी यांच्यामुळे जोडली गेली. अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणूनच आकाशवाणीवर कारकीर्दीला सुरुवात केली होती. एका हिंदी जाहिरातीच्या निमित्ताने त्यांना आकाशवाणीवर हिंदी भाषेत निवेदन करण्याची संधी मिळाली अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्याचे किस्से ऐकवत 'बिनाका गीतमाला' हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला. 1952 मध्ये गीत मला कार्यक्रम सुरू झाला. बहनो और भाईयो... म्हणत श्रोत्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची त्यांची कल्पना लोकप्रिय झाली.

रेडिओवरील सहा दशकांच्या त्यांच्या प्रवासात तयांनी यांनी निवेदनाबरोबर अनेक गायक इतका संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते केले ५४ हजार ऊन अधिक रेडिओ कार्यक्रम आणि एकोणीस हजार सिंगल सादर करण्याचा विक्रमी त्यांचा नावावर आहे.

जादुई आवाजाचा विनम्र निवेदक : मुख्यमंत्री

ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करूनत्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतातअमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ मागील काही पिढ्यांपासून अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून आहे. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने रेडिओच्या चाहत्यांत विनम्र असा आपला माणूस हरपल्याची भावना आहेअसे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



स्वतःच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला : उपमुख्यमंत्री

ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा कलावंत हरपलाअशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री . फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतातआमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली.  त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत.  त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळेत्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे  अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असेलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबीयांना मिळोही ईश्वरचरणी प्रार्थना!


*****