सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट !

Santosh Gaikwad May 10, 2023 11:20 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरूवार (उद्या) सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. या निकालाकडे संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष असतानाचा  शिवसनलेा  ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. मात्र या भेटीत आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.  


 आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले.   रस्ते घोटाळा असो, खडीचा घोटाळा आणि स्किट फर्निचरचा घोटाळा या घोटाळ्यांची माहिती आज राज्यपालांना दिली. हे घोटाळे सध्याचे प्रशासक आणि त्यांच्या अंदाधुंद कारभारामुळे सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईत 6 हजार कोटीचा रस्ते घोटाळा होतोय. केवळ 40 टक्के आणि 60 टक्के कंत्राटदार चालवत आहेत. 400 किलोमीटरचे रस्ते करत असताना साधारणपर्यंत आता पर्यतचे जे रेट असायचे, 5 कत्राटदारांना 5 पॅकेट दिलेत. यामध्ये 66 टक्के वाढ करून कंत्राटदारांना फायदा होतोय, या प्रकरणात प्रशासकाकडून कारवाई होत नाहीय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.


सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मी निकालावर काहीच बोलत नाही आहे. आम्हाला न्याय देवतेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. जर अशी गद्दारी आपल्या महाराष्ट्रात घडलीय ती दुर्लक्ष करत गेलो तर उद्या राजकीय अस्थिरता निर्माण होईलतसेच राहुल नार्वेकर यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. ते घटनाबाह्य अध्यक्ष बसले आहेत का? असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 


मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, सीएम हे करप्ट मॅन आहेत. मुख्यमंत्री कधी शेतात, कधी गुवाहाटी पळतात, पण मला उत्तर देण्याची तयारी दाखवत नाही,अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आज या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करावी अशी मागणी राज्यपाल बैस यांच्याकडे केली.