शिवजयंती निमित्त सोमवारी पत्रकार संघात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

Santosh Gaikwad February 17, 2024 02:17 PM

  
मुंबई :  प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव व शिवजयंतीनिमित्त देशभक्तीपर हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सोमवार दि १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ उपस्थित राहणार आहेत. 


शिवनेर प्रस्तुत ओमकार आर्टस प्रोडक्शन यांच्यावतीने या बहारदार कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक विश्वास दत्ताराम चव्हाण तर निर्मिती संकल्पना नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांची आहे.