डायसाण फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी ठाण्यात रक्तदान आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन

Santosh Gaikwad September 11, 2023 07:01 PM



मुंबई : मानवी रक्त कुठल्याही फॅक्टरीत बनत नाही. ते फक्त मानवी शरिरातच बनते. मात्र वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांचा जीव जातो. तसेच देशात सातत्याने निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता डायसाण फाऊंडेशनच्यावतीने मंगळवार दि १२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते सायं ४ या वेळेत  युनिट ३३०, लोढा सुप्रिमसी-२, रोड नंबर २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ठाणे (प ) येथे रक्तदान आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी  ठाणे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त  डॉ. विनय कुमार राठोड,  सुप्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक विजू माने, नेत्रदान राष्ट्राची गरज या अभियानाचे  श्रीपाद आगासे, सुप्रीमस -२ ठाणे कमर्शियल प्रिमायसेस चे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

 राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो, त्या निमित्ताने दृष्टिहीन व्यक्तींना दृष्टीची संजीवनी देण्यास नेत्रदान है जीवनाचे अमूल्य वरदान आहे. "रक्तदान श्रेष्ठदान" पवित्र श्रावण महिना आणि दहीहंडीनिमित्य रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आणि देश भक्तीचे प्रतीक म्हणून जास्तीत जास्त संख्येने नेत्रदान व रक्तदान शिबिर मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डायसाण फाऊंडेशनचे अतुल तारासिंग राठोड आणि सुप्रिमस-२ ठाणे कमर्शियल प्रिमाईसेस को. आ. सोसायटी लिमिटेड ठाणे(प.) यांनी केले आहे.