52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
राज्यनिर्मितीच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वदिनी राजभवन मुंबई येथील ऐतिहासिक 'जलविहार' या सभागृहाचे आज (दि. ३०) सकाळी घेतलेले छायाचित्र. छायाचित्रात राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रीय पक्षी मोर दोनीही दिसत आहेत.
ध्वजस्तंभाच्या याच परिसरात दिनांक ३० एप्रिल १९६० रोजी मध्यरात्री देशाचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण करण्यात आले होते.
राज्याचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व ५०० निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांनी पसायदान गायले होते.