रविवारी मराठा मंडळाचे ४५ वे वार्षिक स्नेहसंमेलन

Santosh Gaikwad January 23, 2024 06:07 PM


मुंबई : मुलुंडच्या मराठा मंडळाचे ४५ वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड, सांस्कृतिक केंद्र इमारत, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०००८१. येथे संपन्न होणार असून या समारंभात विद्यार्थी व गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे व डॉ. अरुण धुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश शिर्के हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. मराठा मंडळ कलामंच प्रस्तुत ‘रामा रघुनंदना’ हा मराठी-हिंदी गितांचा भक्तीमय कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.