बिनसीडेड मुकुल राणेचा सर्वोत्तम फॉर्म कायम - 360 वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ सीरिज

Santosh Sakpal December 23, 2023 07:33 PM

मुंबई: इंडियन चेस स्कूल आयोजित पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे सुरू झालेल्या केलेल्या 15 वर्षांखालील खेळाडूंसाठीच्या 360 वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ सीरिजच्या दुसर्‍या लेगमध्ये बिनसीडेड मुकुल राणेने त्याचा सर्वोत्तम फॉर्म कायम राखला आहे. तिसर्‍या फेरीनंतर त्याच्यासह आठ खेळाडूंनी प्रत्येकी तीन गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

तिसर्‍या फेरीत मुकुल राणेने विहान राव याला रोखले आणि  गुरु प्रकाश, दर्श शेट्टी आणि अथर्व सोनी या अव्वल मानांकित खेळाडूंमध्ये स्वत:ला सामील करून घेतले. मुकुलने विहानविरुद्ध काळ्या मोहर्‍यांनिशी खेळताना 72 चालींमध्ये रंगलेल्या सामन्यात विजय मिळवला.

टॉप बोर्डवरील हाय-स्टेक सामन्यात, खनक पहारिया या एकमेव महिला खेळाडूने तिसर्‍या सीडेड सीडेड अथर्व सोनीला चांगलेच झुंजवले. मात्र, इटालियन गेममध्ये काळ्या मोहर्‍यांनिशी खेळताना तिने शेवटी 53 चालींमध्ये पराभव स्वीकारला.

तिसर्‍या फेरीनंतर, आठ खेळाडूंचे प्रत्येकी 3 गुण आहेत. पलाश मापारा आणि प्रथमेशने प्रत्येकी अडीच गुणांसह संयुक्तरित्या दुसरे स्थान राखले आहे. तिसर्‍या स्थानी आठ खेळाडू प्रत्येकी 2 गुणांनिशी संयुक्तरित्या तिसर्‍या स्थानावर आहेत.

तिसर्‍या प्रमुख निकाल: गुरु प्रकाश (3) विजयी वि. पर्व हकानी (2).

परम जालान (2) पराभूत वि. दर्श शेट्टी (3).

सोनी अथर्व (3) विजयी वि. खनक पहारिया (2).

पलाश मापारा (2.5) बरोबरी वि. प्रथमेश जी (2.5).

ईशान तेंडोलकर (3) विजयी वि. गोगरी वेदांत (2).

गणेश कदम (2) पराभूत वि. कुश अग्रवालकडून (3).

अर्जुन सिंग (3) विजयी वि. एकम चॅटर्जी (2).

अर्णव थत्ते (3) विजयी वि. मैत्रेयी बेरा (2).

विहान राव (2) पराभूत वि.मुकुल राणे (3).

बिनसीडेड मुकुल राणेचा सर्वोत्तम फॉर्म कायम

- 360 वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ सीरिज