तैवान एक्स्पो २०२३ मध्ये मांडण्यात आलेल्या लक्षणीय नवसंकल्पनांसाठी तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनवर झाला कौतुकाचा वर्षाव

Santosh Sakpal October 20, 2023 07:05 PM

पॅव्हेलियनच्या उद्घाटनासाठी जमले उच्चपदस्थ मान्यवर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि TAITRA चे चेअरमन जेम्स सी. एफ. हुआंग यांनी घेतला पुढाकार

मुंबई, 20 ऑक्टोबर: तीन दिवसीय तैवान एक्स्पो २०२३ची सांगता झाली आणि या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान तैवान एक्सलन्स पॅव्हेलियन हे प्रदर्शन दालन आपल्या अपवादात्मक नवसंकल्पना आणि उत्पादनांच्या प्रदर्शनामुळे आघाडीवर राहिले. आपले प्रतिष्ठित ब्रॅण्ड्स, उत्पादने, अभिनव संकल्पना आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तैवान एक्सलन्सने स्मार्ट तंत्रज्ञान, इंटेलिजन्ट आरोग्यसेवा आणि प्रगत यंत्रसामुग्री या विषयसूत्रांच्या आधारे मांडलेली आपली उत्पादने प्रदर्शित केली.

दालनाच्या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काऊन्सिल (TAITRA)चे अध्यक्ष श्री. सी. एफ. हुआंग तसेच तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर - भारत येथील इकॉनॉमिक डिव्हिजनच्या एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर श्रीम. एस्टेला चेन, TAITRA चे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर श्री. ब्रायन ली यांसारखे तैवान सरकारचे मान्यवर प्रतिनिधी व विख्यात बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय यांची उपस्थिती लाभली. याखेरीज या दालनाला आगंतुक, सहयोगी सदस्य, व्यवसायांचे मालक आणि उद्योजक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाहुण्यांनी भेट दिली व हे दालन एक्स्पोमधले एक गजबजलेले केंद्र बनून गेले.

भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या बाजारपेठेवर बारकाईने लक्ष ठेवत तैवानी ब्रॅण्ड्सनी भारतीय ग्राहकांच्या सतत बदलत्या प्राधान्यक्रमांनुसार आणि मागण्यांबरहुकूम आपल्या उत्पादनांमध्ये सानुकूलता साधली आहे. आरोग्यसेवा उपकरणे, जीवनशैलीशी निगडित उत्पादने, स्मार्ट गॅजेट्स, उत्पादन उपाययोजना, आयसीटी इनोव्हेशन आणि अद्ययावत स्वयंचलित उपकरणे आणि अशा अनेक श्रेणींमधील उत्पादने या प्रदर्शनात मांडली गेली. भारतीय बाजारपेठा विशिष्ट गरजांची पूर्तता करण्याप्रती आणि आपली उत्पादने स्थानिक ग्राहकांना भावतील याची काळजी घेण्याशी असलेली त्यांची बांधिलकी या धोरणात्मक दृष्टीकोनातून दिसून आली.

एक्स्पोच्या पहिल्या दिवशी तैवान एक्सलन्सने भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत काटेकोरपणे घडविलेल्या अद्ययावत उत्पादनांचे अनावरण केले. AROMASE, AIFA, Alaska, ANNIE’S WAY, Biogend, BenQ, Body Charger, CONQUER, CyberPower, dc Mask, D-Link, EverFocus, GWINSTEK, HANRETEC, HCP, HUA-JIE, IBASE, ICP Das, IPEVO, JUSTIME, MEAN WELL, PHISON, Shennona, Z-COM आणि ZYXEL यांसह २५ प्रवर्तक ब्रॅण्डसनी आपली आगळीवेगळी उत्पादने मोठ्या अभिमानाने प्रदर्शित केली.

या उपक्रमाच्या तीन दिवसांमध्ये अनेक कंपन्यांनी आणि उद्योजकांनी या उत्पादन व तंत्रज्ञानांविषयीची माहिती विस्ताराने प्राप्त केली व त्यायोगे तैवानी ब्रॅण्ड्ससह सहयोगाच्या संभाव्य संधींचा धांडोळा घेतला.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारत आणि तैवानमधील आर्थिक सहयोग भरभराटीस आला आहे व यात व्यापार, गुंतवणूक आणि उद्योगक्षेत्रांचा समावेश आहे. २०२२ मध्ये भारत आणि तैवान यांतील व्यापाराचे मूल्य उल्लेखनीय $८.५ बिलियन्सपर्यंत पोहोचले, ज्यातून या नात्याने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

सध्या सुमारे ९० तैवानी कंपन्यांनी भारतामध्ये आपल्या व्यवसाय थाटला आहे, ज्यातून माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे आणि ऑटोमोबाइलचे भाग यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकूण $१.५ बिलियन्सपर्यंतची गुंतवणूक प्रवाहित झाली आहे.

तैवान एक्सलन्सने तंत्रज्ञानापासून शिक्षणापर्यंत आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसह विविध क्षेत्रांमध्ये भारताला मदतीचा हात देण्यामध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे. तैवान एक्स्पोमधील यशस्वी सहभाग हे भारताच्या प्रगती व विकासाला बळ देण्याच्या तैवान एक्सलन्सच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.