सर्वसामान्यांना दिलासा : घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त !

Santosh Gaikwad August 29, 2023 10:57 PM


नवी दिल्ली :  केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करण्याची सरकारने घोषणा केली आहे. तर उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनता खास करून गृहिणींसाठी दिलासा मिळणार आहे. 


३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.