ठाणे - वडपे राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसीकडून रात्रंदिवस खड्डे बुजविण्याचे कामे सुरु

Santosh Gaikwad August 09, 2024 09:13 PM


मुंबई  : गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे  वडपे - ठाणे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले होते.  त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. मात्र  राज्य रस्ते विकास महामंडळाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे कामे हाती घेतले असून,  ठाणे - वडपे राष्ट्रीय महामार्ग हा खड्डे मुक्त केला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मुंबई नाशिक मार्गाची पाहणी करून  या महार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले होते. 

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ येथील मुंबई नाशिक  ठाणे ते वडपे या २३. ५ किमी आठ पदरी रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु आहे. सध्या हे काम  प्रगतीपथावर असून, आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मुसळधार पावसामुळे या महामार्गावर खड्डे पडले असून, खड्डे बुजविण्याचे काम  रात्रंदिवस तीन पाळ्यांमध्ये काम सुरु आहे. आतापर्यंत एमएसआरडीसीने या महामार्गावरील ५५ खड्डे डीबीएम मास्टिकने बुजवले आहेत. खड्डे बुजविण्याचे कामासाठी अतिरिक्त ६ अभियंते रात्रन दिवस नेमण्यात आले आहेत. त्यासाठी खारेगाव प्रकल्प कार्यालय येथे कंट्रोल रूम ची स्थापना करण्यात आली असून, हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. तसेच खड्डे भरण्याची कामे सुरु असताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एमएसआरडीसी कडून वाहतूक पोळी विभागाला १९० ट्राफिक वार्डन देण्यात आलेले असून त्यांना जॅकेट रेनकोट पुरविण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात वाहन ब्रेक डाऊन प्रमाण वाढत असल्याने पोलीस विभागाला ९ क्रेन पुरविण्यात आले आहेत. माणकोली व राजणोली पुलाच्या येथे हलक्या वाहनासाठी डेलिनेटर बसऊन स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काँक्रेट ब्यरिअर लावून नाशिक मुंबईसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे.   
-------