मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

Santosh Gaikwad June 13, 2023 01:55 PM


मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवार, दि. २१ जून, २०२३ रोजी वर्धापनदिनी देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माध्यमसमूहांनी, संपादकांनी, स्वत: पत्रकारांनी अथवा सहकारी पत्रकारही योग्य उमेदवाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. २०२२-२०२३ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्‍या पत्रकारांची नावे आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणांसह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात शुक्रवार, दि. १६ जून, २०२३ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी केले आहे.


 पुरस्कारांचा तपशील

१. पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. ५,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, निकष : शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार, पुरस्कर्ते : श्री. रमेश नाईक

२. कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, निकष : वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रित शोधकास दिला जाणारा पुरस्कार, पुरस्कर्ते : पुत्र श्री. सुकृत खांडेकर 

३. समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. ५,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, निकष : सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा पुरस्कार, पुरस्कर्ते : किर्ती ढोले

४. अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. ५,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, निकष : वृत्तछायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार, पुरस्कर्ते : श्रीमती नीला तोलाराम कुकरेजा आणि अ‍ॅड. अधिक शिरोडकर 

५. युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार, पुरस्काराचे स्वरुप : रु. ५,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, निकष : संपादक/ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा, पुरस्कर्ते : प्रसाद रावकर आणि कुटुंबीय 


बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार्‍या वर्धापन दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.


 वरील पुरस्कारासाठी संपादक किंवा स्वत: पत्रकार तसेच अन्य सहकारी वर्तमानपत्रातील पत्रकारांची शिफारस करू शकतात. संबंधित माहिती (बातमी, वृत्तांत, लेख इ.) आवश्यक झेरॉक्स प्रतीसह  mmps.president@gmail.com ईमेलवर पाठवावी.

**