ईव्हीएम मशीन हॅक करून देताे, ठाकरेंच्या या नेत्याकडे अडीच कोटीची मागणी

Santosh Gaikwad May 07, 2024 06:04 PM


पुणे : ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुण्यातून  आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

 
अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मारुती ढाकणे याने अंबादास दानवे यांना फोन करून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो असे सांगून त्यांच्याकडून अडीच कोटी रूपयाची मागणी केली. या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये  मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.